रतनगड दुर्गभ्रमण….एक अदभुत अनुभव
दिनांक -1/2-8-2018 रोजी दुर्गसखा चैरिटेबल ट्रस्ट आयोजित रतनगड दुर्ग भ्रमण एक अदभुत अनुभव देऊन गेला.खूप दिवसाने मी आपल्या दुर्गसखा परिवारातील या ट्रेक मधे सहभागी झालो.हा माझ्या या सहकार्य बरोबर चा 2009 पासून चा 25 वा ट्रेक होता.नेहमीच ट्रेक बाबत उत्कृष्ट नियोजन व धडपड दुर्गसखा कार्यकारिणीची असते.नवीन लीडर नव्या दमाने जुन्या सहकर्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.तसे पहिल्यास ट्रेक मधील प्रत्येक दुर्गसखा हा .जबाबदरीणे वगणारा एक लीडरच असतो.
पहाटे 2.00 वाजता सुरु झालेला ट्रेक दुसऱ्या दिवशी रात्री 10.30 वाजता संपला. 2.00 वाजता सर्व खर्डीला पोहोचलो. ओळख व दुर्गसखाचे सामाजिक कार्य याची माहिती नविन सदस्याना दिल्यावर सर्व जण जीपने रतनवाड़ी कड़े मार्गस्थ झाले. राकेश व सुनील हे या टीम चे लीडर होते.सुबोधने मार्गदर्शकाचे काम केले.रसतत्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाबरोबर एका हॉटेल मधे चहा व कांदे भाजीचा आस्वाद म्हणजे पर्वणीच होती.ती घेऊन गाड़ीने रतनवाडीकड़े कुच केले.जुनी गाणी प्रवासात मनाला अल्लाहदायक वाटत होतीच. ती खड़यांची उपस्तिथी जाणवू देत नव्हती.गाणी ऐकता ऐकता कधी डोळा लागला ते कळले देखील नाही.पहाटे डोळे उघडले ते भंडारदारा धारणासमोर आणि डोळेच विफारले गेले.अगदी 20 फूटावर असलेल्या धरणाच्या दरवाज्यातुन हेलकावे खात बाहेर पडणारे पाणी पाहिले आणि अजस्त्र पाण्याचा साठा पाहून क्षणभर अंगावर शहारे आले.विस्तीर्ण पसरलेला तो महाकाय पाणी साठा कोणी कॅमेऱ्यामधे तर कोणी मोबाइल मधे बंदिस्त करत होते.अथांग पसरलेले पाणी पाहून कोणाच्या पोटात गोळा आला नसेल तर नवलच.भंडारदारा ते रतनवाड़ी रास्ता म्हणजे महादिव्य.दोष तरी कोणाला द्यायच्या राजकरण्यांना,रस्ते बांधणाऱ्यांना की हे निमुटपणे सर्व सोसणाऱ्या समान्यना. कीव येत होती ती या *खडयातील रस्त्यावर* रोज प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांची. कसे प्रवास करत असतील हे लोक रोज??.रतनवाडीला पोहोचल्यावर फ्रेश होऊन चहा नास्ता घेऊन चढ़ाई ला सुरवात झाली.
हिरव्यागार भात शेतीच्या बांधावरुन निसर्गरम्य रतनगडाच्या मार्गावर अप्रतिम निसर्गसौंदर्यने डोळ्यांचे पारणे फिटले.गुरखी बैल चारत होते.गुरखी आमच्याकडे पाहून ही यडी का खुळी म्हणत असावीत.बैल मात्र आमची परवा न करता निसर्गाने त्यांना दिलेल्या हिरव्या चाऱ्याच्या देंणगीचा अधाशाप्रमाणे फड़सा पाड़त होते. हिरव्या गर्द झाडीतुन दूधसागरासारखे फेसाळत कोसळणारे प्रपात, खळखळ खळखळ असा मंजुळ नाद करत वाहणारे लहान मोठे निर्झर,मधेच रानपाखराचा कलकलाट ट्रेक चा आनंद द्विगुणित करत होती.वाटेत उमलेली रानफुले ही वाऱ्याच्या मंद झुळुके बरोबर हसत हसत आमचे डोलून जणू स्वागत करीत होती.ऊन पावसाचा अदभुत लपंडावाचा खेळ म्हणजे ट्रेकचा खरा आनंद.चिंब भिजत राजमाची नन्तर केलेला हा दूसरा ट्रेक म्हणजे एक अदभुत अनुभव.मधेच एका उंच झाडावर बसलेले पांढरे वानर हे *कोण पाहुणे आलेत आज* या नजरेने झाडच्या टोकवरून करडया नजरेने आम्हाला निरखत होते. गड़ चढ़ताना दुसऱ्या टप्यातील सुबोध ने केलेले ड्रोन शूट म्हणजे थरार.जसाजसा ड्रोन वर जात होता तसातसा दुर्गसख्यांच्या जल्लोषाचा आलेख वाढत होता *क्या बात है* हेच शब्द प्रत्येकाच्या मुखी आपसुक आले.निसर्गाच्या किमया समोर आम्ही विज्ञानाच्या किमयेचा समक्ष अनुभव घेत्त होतो.
रतनगडाच्या शेवटच्या टप्यत शिड्यावर चढ़ाई करताना मात्र पाय थर थरु लागले.खोल दरी दिसेनाशी झाली. बर्फाने अच्छादुन टाकावे तसे रतनगड़च्या भोवतालची हजारो मीटर खोल दरी त्या धवल शुभ्र नभांनी आपल्या अस्तित्वाने भरून टाकली होती आणि भारावून टाकले होते ते आमचे मनही.समोर दिसत होत्या त्या फक्त शुभ्र ढगांची दुलई ओढलेल्या रतनगडाच्या पर्वत रांगा.
गड फेरी करून नढी वर गेलो तो अनुभव आजही अंगावर शहारे आणतो.तूफान वाऱ्या बरोबर ढग व पाऊस यांचा चालले ला पकड़ापकड़ी चा खेळ हा न विसरता येणारा या ट्रेक मधील परमोच्च क्षण. अहाहा! अप्रतिम अनुभव . चढ़ाईचा सर्व क्षीण या अप्रतिम नैसर्गिक जादुई खेळाने विसरायला लावला. अदभुत खरच अदभुत.
गुहेमधे ख़ाललेल्या भाजी भाकरी ची अविट गोड़ी व गरमा गरम वरण भाताचा आस्वाद पाचेपक्वान्न पेक्षा गोड वाटला.
परतीचा प्रवास चढ़ाई एवढाच सुंदर. पाऊस संगतिला होताच.तो जणु आम्ही थकु नये ही काळजी घेत असावा. सुंदर धबधबयातील ग्रुप फ़ोटो सेशन,हिरव्या गर्द झाड़ी व निसर्गाच्या कैनव्हास बरोबर सेल्फी घेत 5.00 वाजता सर्व रतनवाड़ीला परतलो.
हेमाडपंथी शिव मंदिरातील अमृतेश्वराचे सर्वांनी दर्शन घेतले.कोरडे कपड़े घालून चहा घेतला व परतीच्या प्रवासास निघलो.9.17 ची कसारा वरुन लोकल पकडून घरी परतलो.
घरी आंघोळ केली आणि झोपी गेलो.झोपेतही दिसत होते ते गर्द हिरवी राने,ती माजलेली चरणारी जीवा शिवाची बैल जोड़ी,विविध रूप धारण करून वाह णारे धबधबे,ऐकू येत होता तो रानपाखरंचा किलबिलाट,ती धुक्यात हरवलेली हरिश्चंद्रगडाची वाट,ती गोड हसणारी निळी पिवळी चमुकली रानफुले, वनराईच्या पहारेकारी प्रमाणे आम्हाला न्याहळणारे कपिराज,तो गड़ावरील हजारो वर्ष उन पाऊस झेलत उभा असलेला टेहा ळणी बुरुंज,किल्यामधील यशाची पताका अजूनही फड़कत ठेवणारी कमान, पायवाटेतुन जाताना ते किरवीचे साम्राज्य आणि तो नढी वरील सुसाट वाऱ्या बरोबरची पावसाची व धवल नभांची संगीत मैफिल सजावी अशी ती जुगलबंदी.
………………….आणि बोचरे वारे जाणवू नये म्हणून मी झोपेतच पांघरलेली शाल अलगद अंगावर सारखी करून घेतली.
–एक दुर्गसखा.