एखादे सण हे साजरे होतात ते त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळेच आणि असेच अनेक रंग आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर, मार्गांवर विश्वासाचे हात धरून आपल्यात सामील होतात.आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला हेच रंग हातभार लावतात, पण यात काही असे ही निराळे रंग असतात जे आपल्या आयुष्याबरोबर दुसऱ्यांच्या ही आयुष्याला बहारावण्यासाठी, खुलवण्यासाठी फुलवण्यासाठी हातभार लावतात. प्रत्येकाचे रंग निराळे, पण काहींचे रंग हे त्या पोत्यात असणाऱ्या त्या गव्हातील खडकाप्रमाणे सारखे असतात, आकार वेगळा असतो पण रंग सारखा….अन हेच ते रंग असतात वेडेपणाचे,उत्साहाचे.

” बुलंदियों पे पहुँचना कोई कमाल नहीं,
बुलंदियों पे ठहरना कमाल होता है “
दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे गेली १० वर्ष दुर्गभ्रमंती सोबत सामाजिक कार्याचे काम ही करत आली आहे. दरवेळी नवी ध्येय, नवी जिद्द घेऊन संस्थेतील सगळेच सदस्य जोमाने काम करतात अन एकत्र येतात. सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरू झाल्या. अन याचवेळी संस्थेकडून यावर्षी १८४६ गरजू विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य वाटपाचा असा हा प्राथमिक स्वरूपाचा कार्यक्रम हा ” जिल्हा परिषद शाळा सावरदेव- केंद्र साखरोली-तालुका शहापूर ” येथी पार पाडला गेला. सावरदेव शाळा ही आपल्या तानसा अभयारण्य क्षेत्रातील अतिदुर्गम भागातील ही शाळा. शाळेतील मुलांची एकूण पटसंख्या ही २५ होती. याच मुलांच्या सोबत संस्थेने प्राथमिक स्वरूपात ” वार्षिक शैक्षणिक साहित्य तसेच MSA Gifting Solution या आपल्या नंदू चव्हाण दादाकडून मिळालेल्या बॅग्सचे ” वाटप करण्यात आले.
तसेच संस्थेकडून दरवर्षी राबविण्यात जाणाऱ्या *दत्तक पालक योजनेमधील* श्री महेंद्र धीमते आणि दुर्गसखा संस्थेकडून इयत्ता चौथी पासून शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलेली मुलगी
” समीरा अन्वर शेख “ हिने यंदाच्या दहावीच्या बोर्डात कोणत्याच प्रकारचा क्लास न लावता ९०% गुण मिळवले होते. यावेळी संस्थेकडून तिचा आणि तिच्या आजीचा गौरव करण्यात आला, तसेच *तिच्या पुढील शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांचा खर्च हा दुर्गसखा संस्थेमार्फत केला जाणार आहे* गावातील एक विद्यार्थिनी शिकली तर गाव सुधारते, हे एक उत्तम उदाहरण. तिच्या याच गुणकौशल्यामधून निभळपाडा येथील अनेक विद्यार्थ्यांचा कल हा शिक्षणाकडे जास्तीत जास्त वळला आहे.
” बिना संघर्ष के मनुष्य कभी ही चमक नही सकता, जो जलेगा उसीके ही दिये में उजाला दिखाई देता है. “
दरवर्षीप्रमाणे शहापुर येथील आदिवासी विभागातील वार्षिक शिक्षण साहित्य वाटप उपक्रमासाठी हजर असलेले ५० सदस्य आणि सर्व छोटे दुर्गसखे शिलेदार, तसेच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केलीये वा हातभार लावलाय, दुर्गसखा त्यांचा आभारी नव्हे तर ऋणी राहील. कारण आभार मानले तर ते परकेपणाचे होईल अन तुम्हाला मुक्त केल्यासारखे होईल. म्हणून आम्ही ऋणी राहुन आपल्या सर्वांना एका सामाजिक भावनेच्या धाग्यात बांधुन ठेवत आहोत.आजवर जो तुम्ही दुर्गसखावर जो विश्वास दाखवलात तो विश्वास पुढेही तसाच ठेवा, किंबहुना आम्ही त्यास पात्र राहू यासाठी आम्ही दुर्गसखे कटीबद्ध आहोत.
” मैने रखा हैं यकीन बस अपने इरादों पर
मेरी अगर होती हैं हार तो
वो मेरे हौसलों से तो बड़ी नहीं होगी. “
आपला विश्वासू ,
चेतन सुमन रमेश राजगुरू
-:दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट:-
“पर्यटनातून प्रबोधन.. एक पाऊल मानवतेकडे.”